

Kalyan-Dombivli Dangerous Buildings
ESakal
कल्याण : भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केडीएमसी हद्दीतील तब्बल ६६१ इमारती धोकादायक, तर त्यापैकी २०४ इमारती अतिधोकादायक असल्याचे महापालिकेच्या नोंदीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे १४३ अतिधोकादायक इमारतीमध्ये शेकडो नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. या इमारती तातडीने रिकाम्या करून आवश्यकतेनुसार पाडण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून, सहकार्य न करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.