Ravindra Chavan
esakal
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी, युती आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट आणि संतुलित भूमिका मांडली आहे. काही प्रभागांत त्यांच्या समोर कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया कुठल्याही दबावातून झालेली नसून, त्या भागातील सर्व कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी एकमताने घेतलेला निर्णय असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.