

BJP
esakal
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा फार्म्युला ठरत असताना भाजपामध्येच नाराजीचे वादळ उठले आहे. विशेषतः कल्याण पूर्वेत भाजपाला अवघ्या सात जागा देण्यात येत आल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार प्रचंड अस्वस्थ झाले असून, याच नाराजीचा उद्रेक शुक्रवारी रात्री भाजपाच्या कल्याण पूर्वेतील आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात पाहायला मिळाला.