

KDMC Election BJP Candidate Win
ESakal
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपने आपले विजय खाते उघडले आहे. त्यांच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी, रंजना मितेश पेणकर आणि आसावरी नवरे यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. रेखा चौधरी सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. तर आसावरी नवरे पहिल्यांदाच महानगरपालिकेत प्रवेश केला आहे.