

Kalyan Dombivli Municipal Corporation
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालांनी महायुतीला सत्ता मिळवण्याचा मार्ग खुला केला असला, तरी सत्तेच्या सारीपाटावर आता खरी लढाई सुरू झाली आहे, ती शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वर्चस्वाची. दोन्ही पक्ष ससा-कासवाच्या खेळाप्रमाणे एकमेकांच्या पुढे-मागे धावत असून “महापौर कोणाचा?” या मार्गांवर आता ससा कोण आणि कासव कोण ठरत हा प्रश्न युतीसाठीच सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.