BJP and shivsena
डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध निवडून येत असताना, दुसरीकडे एका पॅनलमध्ये मात्र भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना आमनेसामने येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे ‘युतीधर्म पाळला गेला का?’ असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.