

Political Shift in Kalyan-Dombivli
Sakal
डोंबिवली : डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारी घटना घडली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि सध्या प्रदेश सचिव म्हणून कार्यरत असलेले संतोष केणे उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे उद्या भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाला धक्का देत भाजपने त्यांना आपल्या गळाला लावले, त्यानंतर आता काँग्रेसलाही दिलेला हा धक्का राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.