डोंबिवली - कोरोनामुळे ठाण्यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच आता कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील एका महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे..कल्याण डोंबिवलीमध्ये चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. केडीएमसीत कोरोनाचा हा पहिलाच बळी असून असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना चे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर महिला उपचारासाठी ज्या दिवशी दाखल झाली त्या दिवशी रात्री तिचा मृत्यू झाला आहे.सोमवारी त्या रुग्ण महिलेचा रिपोर्ट आल्यानंतर तिचा मृत्यू कोविड या आजाराने झाल्याची बाब उघडकीस आली असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कोविडचा पहिला बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.उर्वरित तीन रुग्णांपैकी एका रुग्णाला दवा उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तिसऱ्या रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर चौथा रुग्णाला अधिक उपचारासाठी कळवा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे डॉ. शुक्ल यांनी सांगितले..कल्याण डोंबिवली महापालिका शेतीमध्ये कोविड या आजाराने जरी शिरकाव केला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला देण्यात आला आहे. महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात येथे पाच बेडचे कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन कक्ष, कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दहा बेडचे कोविड रुग्णांसाठी आयसोलेशन कक्ष उभारण्यात आले आहे.त्याचबरोबर दोन्ही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि औषधांची सुविधाही ठेवण्यात आली आहे. तसेच आर टी पी सी टेस्ट लॅब कार्यान्वित करण्यात आली असून दोन्ही रुग्णालयांमध्ये स्वॅप चाचणीची व्यवस्था ही करण्यात आली असल्याचे डॉ. शुक्ल यांनी सांगितले..कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पालिका क्षेत्रात कोरोनाने शिरकाव केला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात कोविड नियंत्रणात आहे..पालिकेच्या वतीने आवाहन1. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी विशेषतः सह-व्याधी असणा-या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे.2. डॉक्टर, पॅरामेडिकल अणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य संस्थामध्ये/रुग्णालयात मास्कचा वापर करावा.3. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे.4. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यु वापरणे.5. हाताची स्वच्छता राखणे/वारंवार हात धुणे.6. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे7. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी.8. श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे.9. कोविड उपचार व निदानाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे..10. बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण व शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोबिवली येथे अलगीकरण कक्ष तयार करण्यांत आलेले असुन ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कोविड साठी घेण्यांत येणारी स्वॅब तपासणी दोन्ही रुग्णालयात करण्यांत येते.11. कोविड तपासणी करण्यासाठी महापालिकेची गौरीपाडा आरटीपीसीआर लॅब उपलब्ध आहे.12. सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी.13. लक्षणे सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणुन कार्यालयात, शाळा, महाविद्यालये ठिकाणी/गर्दीच्या ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत स्वतः घरी अलगीकरण करावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.