कल्याण ग्रामीणमधून मनसेने उघडलं खातं Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा सुमारे साडेपाच हजारांच्या मतांनी पराभव करत राज्यातून खाते उघडले.

मतमोजीणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले प्रमोद पाटील यांनी 9 व्या फेरीपर्यंत मतांची आघाडी कायम ठेवली. मात्र, दहाव्या फेरीपासून शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांनी आघाडी घेत मोठी चुरस निर्माण केली होती.

25 व्या फेरीपर्यंत म्हात्रे यांनी 217 मतांची आघाडी ठेवली होती. मात्र, 26 व्या फेरीत मनसेच्या प्रमोद पाटील यांनी आघाडी घेत 28 व्या फेरीपर्यंत ती 5568 मतांवर नेली. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनीही जल्लोष सुरू केला.

kalyan gramin vidhansabha constetuency MNS candidate won

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalyan gramin vidhansabha constetuency MNS candidate won