Kalyan Khadakpada: नवरा शारीरिक सुख देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीची पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल

नवरा शारीरीक सुख देत नसल्याच्या वादातून एका 32 वर्षीय पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची खळबळजनक घटना कल्याण परिसरात उघडकीस आली आहे.
Kalyan Khadakpada: नवरा शारीरिक सुख देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीची पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल
Updated on

Kalyan Dombivili News: नवरा शारीरीक सुख देत नसल्याच्या वादातून एका 32 वर्षीय पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची खळबळजनक घटना कल्याण परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात 40 वर्षीय पती नपुसंक असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे लग्नापूर्वी बायकोला शारीरीक सूख देऊ शकत नाही हे माहिती असूनही नवऱ्याचे ही माहिती आपणास लग्नापूर्वी दिली नाही. लग्न करुन आपणास शारीरीक सुखापासून वंचित ठेवले असे तक्रारीत पत्नीने नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षीय तक्रारदार महिला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका दुर्गम असलेल्या गावात कुटूंबासह राहणारी आहे. तिचे लग्न नातेवाईकांच्या ओळखीतून कल्याण पश्चिम मधील शहाड येथील एका 40 वर्षाच्या तरूणाबरोबर गेल्या वर्षी जून मध्ये झाले. लग्नापूर्वी विवाहितेच्या नातेवाईकांनी तुम्ही विवाहासाठी ४० वर्ष होऊन सुध्दा का थांबले असे विचारले त्यावेळी नवऱ्याने आपण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. म्हणून आपणास विवाहास विलंब झाला, असे कारण दिले होते. (Latest Marathi News)

तसेच तक्रारदार बायकोने नवरा शिकलेला आहे. म्हणून त्याला पसंत केले होते. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात नाशिक जवळील इगतपुरी भागात पार पडले. मात्र लग्नानंतर नवरा विक्षिप्तपणे वागत असल्याचे तक्रारदार बायकोला आढळले. तिने नवऱ्याला भावनिक नात्याद्दल समजून सांगितले. परंतु नवऱ्यामध्ये काही दोष आहेत हे तक्रारदार बायकोला निदर्शनास आले. ती सुरुवातीला अस्वस्थ होती. या अस्वस्थेतमधून ती शहापूर तालुक्यातील माहेरी निघून गेली.

Kalyan Khadakpada: नवरा शारीरिक सुख देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीची पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल
Chandigarh Mayor Election: पहिल्याच परीक्षेत 'इंडिया' आघाडी नापास, भाजपाची 'फर्स्ट क्लास'कामगिरी

दरम्यान, नवरा आणि सासरच्या मंडळींच्या आग्रहामुळे ती परत माहेरी आली. तिला नवऱ्या मधील भावनिक दोष प्रकर्षाने दिसून आले. घरात असताना नवऱ्याच्या पिशवीत तो डॉक्टरांकडून काही औषधे घेत असल्याचे आढळले. तिने गुपचूप संबंधित डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरने नवऱ्या मध्ये काही भावनिक दोष आहेत. (Latest Marathi News)

त्यासाठी ते हे औषधे घेत असल्याचे सांगितले. यामुळे नवऱ्या कडून आपणास कधीही शरीरसुख मिळणार नाही याची खात्री पटल्यावर नवरा नपुसंक आहे हे माहिती असुनही आपला विश्वासघात आणि फसवणूक केल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात बायकोने केली आहे.

Kalyan Khadakpada: नवरा शारीरिक सुख देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीची पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल
Raj Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यात राज ठाकरेंची मोठी खेळी! CM शिंदेंना दिला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांचा सेनेला रामराम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com