Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावाची चर्चा

सर्वच पक्षांकडून जिंकण्यासाठी रणनितीची आखणी
Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावाची चर्चा

डोंबिवली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कल्याण लोकसभेचा गड जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपने मिशन महाराष्ट्रमध्ये या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून शिंदे गटाकडून ही जागा भाजपला सोडली जाण्याची दाट शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी सक्रिय झाली असून कल्याण लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्यासाठी आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अभेद्य राखण्यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. आत्तापर्यंत वाट्याला न आलेल्या जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. मिशन महाराष्ट्र अंतर्गत १६ जागांची निवड करत भाजपने येथे आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. (Kalyan Lok Sabha 2024 shivsena Shrikant Shinde Ncp Anand Paranjape)

Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावाची चर्चा
10th SSC Result 2023: उद्या १ वाजता लागणार दहावीचा निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकेल, असे संकेत दिल्याने याठिकाणी भाजप जागा लढविण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू आहे.

आनंद परांजपे हे २०१४ मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगर येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे उपस्थित होते.

आमदार आव्हाड यांना कल्याण लोकसभेच्या जागेविषयी परांजपे यांचे नाव चर्चेत आहे, असे विचारण्यात आले असता त्यांनी परांजपे येतील का माहिती नाही, पण येथे आनंदाचे वातावरण नक्की असेल, असे सांगत अप्रत्यक्षरित्या आनंद यांच्या नावास प्राधान्य असल्याचे सूतोवाच दिले.

कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गट व भाजपची युती असल्याने या मतदारसंघावर भाजपने दावा दाखविल्यास सध्याचे विद्यमान खासदार डॉ. शिंदे हे ठाण्यातून निवडणूक लढवून भाजपला ही जागा देण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे स्पष्ट नसले तरी राष्ट्रवादीसोबत ठाकरे गट या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसून येते. तर ठाकरे गटाकडे धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा आल्यास आनंद परांजपे हे धनुष्यबाण या चिन्हावरच कल्याणमध्ये निवडणूक लढू शकतात आणि महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा त्यांना असेल, अशी चर्चा सुरू आहे.

Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावाची चर्चा
SSC Exam Result 2023 : नापास झालात?मार्क्स कमी पडलेत? बोर्डाकडून पुन्हा मिळेल संधी

ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे इच्छुक असून मागील विधानसभेत शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती. त्यानंतर मात्र ही चर्चा थंडावली. दोन वर्षातच शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर भोईर हे ग्रामीण भागात पुन्हा सक्रिय झाले आहेत.

त्यांच्या कामाचा धडाका पाहता ते खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावलेल्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख कार्यकर्त्यांनी केल्याने या सर्व चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील जागा

कल्याण लोकसभा हा कळवा ते अंबरनाथपर्यंत आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. सहापैकी तीन मतदारसंघ डोंबिवली, उल्हासनगर आणि कल्याण पूर्व हे भाजपकडे आहेत. पूर्वेत भाजप समर्थक अपक्ष आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, तर अंबरनाथमध्ये शिवसेनेची (शिंदे गटाचे) सत्ता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com