Kalyan Loksabha Election : कल्याण लोकसभेत कोस्टल रोड, मेट्रो आणि रस्त्यांचे जाळे संकल्प

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले.
dr. shrikant shinde mnifesto
dr. shrikant shinde mnifestosakal

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले. पुढील पाच वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण अशी विविध महत्त्वाची कामे करण्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला २०१४ मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्याने, २०१९ मध्ये साडेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले. गेल्या १० वर्षांत आपण कल्याण लोकसभेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

तसेच गेल्या निवडणुकीत आपण दिलेल्या आश्वसनांपैकी ९० टक्के कामे पूर्ण केली असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर या निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करताना दिसत आहेत. श्रीकांत शिंदे हे आपल्याच पक्षाचे उमेदवार आहेत, अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना झाल्याचे दिसत असून पावलो-पावली त्याची प्रचिती येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र पाठवून केले कौतुक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कल्याणमध्ये महाविजय संकल्प सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. या पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांनी मतदारसंघातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा क्षेत्रात खासदार डॉ. शिंदेकडून झालेल्या कामाबाबत कौतुकाची थापही दिली आहे. तसेच केंद्रातील विविध संसदीय समित्यांच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या योगदानाचाही गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. श्रीकांत शिंदे निवडून आल्यावर नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे काम करतील - आमदार राजू पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यानंतर ज्याप्रमाणे पुढील १०० दिवसांचे कामाचे नियोजन केले आहे, त्याच धर्तीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही काम करतील, असा विश्वास मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गेल्या १० वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली विकासकामे कोणीही नाकारू शकणार नाही. आम्हीही विकासकामांबाबत त्यांना सूचना करणार असल्याचे सांगत येत्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी बहुमताने निवडून देण्याचे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी केले.

डॉ. श्रीकांत शिंदे यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी पदवी द्यावी - माजी खासदार आनंद परांजपे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांसह केलेला विकास पाहता त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी पदवी द्यावी, असे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे यांनी काढले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल या माध्यमातून मतदार संघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केल्याचेही आनंद परांजपे यावेळी म्हणाले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून लहान लहान प्रश्नही सोडविण्याचे काम - भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी

गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून देश पातळीवरील मुद्द्यांसोबत मतदारसंघातील लहान लहान प्रश्न सोडविण्याचे कामही झाल्याची भावना यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न, शिवमंदिर कॉरीडॉर अशा सर्वच कामांना डॉ. शिंदे यांनी न्याय देण्याचे काम केल्याचे सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, शिवसेनेचे कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, भाजपा कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, आगरी समाजाचे नेते गुलाब वझे, तालुकाप्रमुख महेश पाटील, विधानसभा संघटक बंडू पाटील, विवेक खामकर, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, विकास म्हात्रे, राहुल दामले, नितीन पाटील, शैलेश धात्रक यांच्यासह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी तसेच सन्माननीय पत्रकार बांधव उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संकल्पपत्राची ठळक वैशिष्ट्ये!

गेमचेंजर प्रकल्प -

- कल्याण ते ठाणे कोस्टल रोड

- मतदारसंघातील सर्व शहरात मेट्रोचे जाळे

- ऍक्सेस कंट्रोल मार्ग

- कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प

- जलवाहतूक

रेल्वे - रस्ते -

- मतदारसंघात उन्नत मार्गांची उभारणी

- विविध ठिकाणी उड्डाणपुलांचे जाळे

- भूमिगत वाहनतळ आणि बहुमजली वाहन तळ उभारणी

- रेल्वेच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेला गती

- दातिवली स्थानकात कोकण रेल्वे थांबवण्यासाठी प्रयत्न

- दिवा वसई मार्गावर लोकल गाड्या

- कल्याण पनवेल लोकल सेवा

- कल्याण कर्जत, कल्याण कसारा शटल सेवा.

आरोग्य -

- कल्याण लोकसभेत एम्सच्या धर्तीवर रुग्णालय

- प्रत्येक शहरात नो कॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी

- शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सोयी सुविधांची उभारणी

इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प -

- महिला - तरुण - दिव्यांग - दृष्टीहिनांचे सक्षमीकरण

- केजी ते पीजी शिक्षणाची हमी

- युपीएससी आणि एमपीएससी केंद्रांची उभारणी,

- कल्याण आणि अंबरनाथमध्ये टाटाचे कौशल्य संवर्धन केंद्र

- स्टार्टअप उभारणीसाठी महाहाबची उभारणी

- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार

- रेल्वेच्या जागेत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न

- बालेवडीच्या धर्तीवर स्पोर्ट्स अकादमी

- ग्रामीण भागाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी

- मतदारसंघातील अध्यात्मिक आणि धार्मिक ठिकाणांचे जतन

- कल्याणात खाडी किनारी वॉटर फ्रंट विकसित करणार

- मतदारसंघासाठी स्वतंत्र धरण उभारण्यासाठी प्रयत्न करणार

- एकात्मिक शासकीय कार्यालयाची निर्मिती

- पर्यावरण रक्षणासाठी विशेष लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com