kalyan crime: मोठी बातमी! कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने जीवन संपविले, तळोजा कारागृहात घेतला गळफास, वकिलांना वेगळाच संशय

Vishal Gawali : कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल गवळी ने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर तिचा निर्घृणपणे खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेह एका बॅगेमध्ये कोंबून ठेवला.
kalyan crime accused vishal gawli end life in taloja jail
kalyan crime accused vishal gawli end life in taloja jailesakal
Updated on

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. रविवारी पहाटे त्याने आत्महत्या केली असून तळोजा मागील साडे तीन महिन्यांपासून तो कारागृहात होता. दरम्यान गवळीच्या आत्महत्येमुळे कल्याणमध्ये लोकांना आनंद व्यक्त केला असला तरी जेल प्रशासनावर प्रश्नचिह्न उभे राहिले आहे. विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.अक्षय शिंदे सारख त्याला देखील मारलं आहे असा वकिलांचा आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com