विधानपरिषद निवडणूक 2021 : या दोन जागांसाठी भाजपने कोल्हापूरची जागा सतेज पाटलांसाठी सोडली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satej PAtil, Dhanjay Mahadik

काँग्रेसचे सतेज पाटील कोल्हापूरच्या जागेवर बिनविरोध निवडून आले आहेत. पण, भाजपने कोल्हापूरमध्ये काँग्रेसला का संधी दिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामागे देखील दोन कारणे आहेत.

विधानपरिषद : या दोन जागांसाठी भाजपने कोल्हापूरची जागा सतेज पाटलांसाठी सोडली!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : सध्या राज्यातील सहाही जागांसाठी विधानपरिषद निवडणुका (Maharashtra Legislative Council Election 2021) बिनविरोध होणार आहेत, अशी माहिती आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur) जागेवर शिक्कामोर्तब झाले असून पक्षाच्या आदेशानंतर अमल महाडीक यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे सतेज पाटील या जागेवर बिनविरोध निवडून आले आहेत. पण, भाजपने कोल्हापूरमध्ये काँग्रेसला का संधी दिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामागे देखील दोन कारणे आहेत.

हेही वाचा: राज्यातील सहाही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार?

भाजपने धुळे आणि नंदुरबारमधून अमरिश पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे धुळे-नंदुरबार स्वतःच्या ताब्यात असावं, असं भाजपला वाटत होतं. तसेच भाजपला मुंबईची एक जागा पाहिजे होती. त्यामुळे भाजपने मुंबई आणि धुळे-नंदुरबार या दोन जागांच्या बदल्यात कोल्हापूरची जागा सोडली. त्यामुळे कोल्हापुरातून काँग्रेसच्या सतेज पाटलांना संधी मिळाली आहे. याबाबत स्वतः धनंजय महाडीक यांनी माहिती दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळातच अमित शाह यांनी धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. यानंतर महादेवराव महाडिक यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.

loading image
go to top