कल्याण - मुरबाड नवीकोरी आराम बस सुरु

murbad
murbad

सरळगाव (ठाणे) - कल्याण - मुरबाड प्रवास सूकर होण्यासाठी शिवशाही बसच्या धर्तीवर मूरबाड आगारात नवीकोरी आराम बस दाखल झाली आहे. भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसचे उदघाटन करून कल्याण-मुरबाड अशा प्रवासाला सुरवात झाली.   

कल्याण - मुरबाड हा प्रवास प्रवाशांच्या दृष्टीने त्रासाचा प्रवास होता. कल्याण-मुरबाड प्रवासी वाहातूक करणा-या काळी-पिवळी जीपला 9 प्रवाशांची मान्यता आहे. तरी जीपमध्ये 13 प्रवाशी कोंबून नेत असल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. नाईलाजाने हा जीपमधून प्रवास करावा लागत असल्याने कल्याण-मुरबाड स्वतंत्र बस फे-या सूरू करव्या असी मागणी सातत्याने होत होती. कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरून जाणा-या शिवशाही या ए. सी. बसमध्ये कल्याण- मुरबाड असा प्रवास करता येत नसल्याने प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. 

मुरबाड आगाराला आरामदायक बस मिळाल्या म्हणून आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने व ठाणे जिल्हा विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण याच्या सहकाराने आराम बस मिळाव्या असे प्रयत्न होते. या प्रयत्नांना यश आल्याने ठाणे जिल्ह्यातील फक्त मुरबाड आगारात या टू. बाय. टूच्या बसचे आगमन झाले. या आलेल्या आरामदायक बसला आमदार किसन कथोरे याच्या हस्ते व ब्रम्ह कूमारी वैशला दीदी, अलका दीदी, मा. नगराध्यक्ष वैभव भोसले, नगरसेवक विकास वारघडे, आगार व्यवस्थापक सतिश मालचे, यंत्र अभियंता अविनाश कुलकर्णी, प्रदोष हिंदूराव च्या उपस्थितीत हिरवा कंदिल दाखवून कल्याण - मुरबाड प्रवास सूरू झाला. 

शिवशाही या एसी बसमध्ये प्रवास करता येत नसल्याने कल्याण- मुरबाड प्रवास करणा-या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.आता आगारात शिवशाहीच्या धर्तीवर नॉन एसी बस स्थानकात दाखल झाली आहे. आणखी एक बस येणार आहे. या दोन्ही बसेस पूर्ण दिवस अर्ध्या तासाच्या फरकाने कल्याण- मुरबाड प्रवास करणार असल्याने प्रवाशांना होणारा त्रास दूर होईल. या बस मधून प्रवास करणा-या प्रवाशांना जास्त प्रवास भाडे न देता नेहमी प्रमाणे साध्या दरात प्रवास करता येणार आहे
-सतिश मालचे, आगार व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com