Mumbai : कल्याण आणि पालघर लोकसभा मतदार संघावर भाजपाचा दावा ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

Mumbai : कल्याण आणि पालघर लोकसभा मतदार संघावर भाजपाचा दावा ?

Mumbai : कल्याण आणि पालघर लोकसभा मतदार संघावर भाजपाचा दावा ?

मोर्चेबांधणीला भाजपकडून सुरुवात

Kalyan Palghar LokSabha voters claim by bjp Dombivli

डोंबिवली : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 16 लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रवास करत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात असून भाजपाने येथे देखील मोर्चेबांधणी आखल्याने भाजपा येथे आपला उमेदवार उभा करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. कल्याण आणि पालघर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्र्यांचा लवकरच दौरा होणार असून भाजपाने त्यापद्धतीने आखणी देखील केली आहे.

शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपाचा पाठींबा मिळवत एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे राज्यात सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली असून खरी शिवसेना ही आपलीच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना फुटी प्रकरणाबाबत निर्णय राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाचा आहे. तसेच येत्या दोन वर्षात देशाच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत.यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. या अंतर्गत ते नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षबांधणीचे काम करणार आहेत. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. दरम्यान याच तयारी करता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा क्षेत्रात येणार असून त्यांचा तीन दिवसीय दौरा आहे.

कल्याण लोकसभा क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर या शहरात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे 11 ते 13 सप्टेंबर असा तीन दिवसीय दौरा करणार आहेत.तर तीन शहरातील चार मतदारसंघ आणि ग्रामीण भागात केंद्रीय मंत्री ठाकूर जातील. यामध्ये नागरिक,वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत बैठका करणार आहेत.आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एकंदरीत ही तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.तर या दौऱ्याबाबतची माहिती देण्यासाठी भाजप कडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी भाजप आमदार संजय केळकर यांनी दौऱ्याबाबतची माहिती दिली आणि सांगितले की या ठिकाणाहून कमळ निवडणूक गेले पाहिजे असे भारतीय जनता पार्टीचे नियोजन आहे.तर या लोकसभा शंभर टक्के तयार झाल्या पाहिजेत पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी असे काम आमच्याकडून सुरू झाले आहे,असेही केळकर यांनी सांगितले.तर कल्याण लोकसभेवर भाजप दावा करणार का प्रश्न केल्यावर केळकर यांनी सांगितले की राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडुन गेले पाहिजे दिल्लीला, हे प्लँनिग सहा महिन्यांपूर्वी झाले आहे,त्या दृष्टीने काम चालू झालेलं आहे.

Web Title: Kalyan Palghar Loksabha Voters Claim By Bjp Dombivli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..