

Kalyan Prostitution Case
ESakal
कल्याण : काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्याव्यवसायाची टोळी चालवणाऱ्या 6 महिलांवर पोलिसांनी थेट 'मकोका'अंतर्गत कारवाई केली होती. या टोळीने २० महिलांना वेश्या व्यवसायाच्या धंद्यात ढकललं होतं. त्यानंतर आता पुन्हा कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याण येथे मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.