
Latest Crime News: पुणे येथील योगेशला ऑनलाइन रमी खेळण्याचा नाद होता. या नादात तो कर्जबाजारी झाला. रमी खेळण्यासाठी पैसे लागत असल्याने सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
मात्र कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने त्याचा शिताफीने शोध घेत त्याला कल्याणवरून अटक केली. योगेश चव्हाण (वय २७) असे अटक तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.