

Thackeray Group Candidate Bhima Mane Joins Shiv Sena Under Shrikant Shinde’s Leadership
sakal
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत पॅनल क्रमांक 30 (ड) मध्ये मोठा राजकीय उलटफेर घडला असून, कल्याण ग्रामीण भागात शिवसेना महायुतीची लढत एकतर्फी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले रामचंद्र गणपत माने उर्फ भीमा यांनी बुधवारी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुन बाबू पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.