
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी ही वाहनचालकांसाठी रोजची डोकेदुखी झालेली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वार मिळेल त्या चिंचोळ्या मार्गातून आपली दुचाकी काढताना दिसतात. यापूर्वी पाईपलाईन मधून घुसण्याचा प्रयत्न दुचाकीस्वारांनी केल्याचे आपण पाहिले होते. आता नामफलकाच्या खालून घुसखोरी करून दुचाकीस्वार आपला मार्ग बनवत असल्याचे कल्याण शीळ रोडवर दिसून येत आहे. रिजन्सी चौकात हा प्रकार दिसून आला असून याचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल होत आहे.