
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवर गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यातच मध्यरात्री अचानक मोठा दिशा दर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही साईडची वाहतुक ठप्प झाली होती.दरम्यान घटनास्थळी मनसे नेते राजू पाटील, पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी पोहचले आणि पोलीस, फायब्रिगेड यांना बोलवून घेऊन पडलेला फलक बाजूला काढला.. दरम्यान या घटनेत एक बाइक स्वार जखमी होता होता वाचला..