Former MLA Raju Patil : कल्याण शीळ रोडची परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल

कल्याण शीळ रोडचे अनेक भागात रुंदीकरण काम रखडले आहे. सहा लेनचा हा मार्ग होणार आहे.
Former MLA Raju Patil
Former MLA Raju Patilsakal
Updated on

डोंबिवली - कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीत तासन तास नागरिक खोळंबत आहे. वर्षानुवर्षे या मार्गावर हीच परिस्थिती असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासन पहात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या समस्येवरून मनसेचे नेते कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक एक्स पोस्ट केली असून यातून सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आले आहे. तसेच परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देखील दिला आहे.

कल्याण शीळ रोडचे अनेक भागात रुंदीकरण काम रखडले आहे. सहा लेनचा हा मार्ग होणार आहे. मात्र या रखडलेल्या कामामुळे केवळ चार लेनचाच मार्ग तयार झाला आहे. यातच लोकसभा निवडणुकीनंतर या मार्गावर मेट्रो चे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे रस्त्याच्या मध्य भागातील दोन लेन या पत्रे लावून बंद करण्यात आल्या आहेत.

यामुळे या भागात वाहन कोंडी होऊन अवघा 1 किमी अंतराचा टप्पा गाठण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. बुधवारी सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस अडकल्याने शाळा प्रशासनाला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सहा महिन्यांच्या कालावधीत तिसऱ्यांदा घ्यावा लागला आहे.

या वाहतूक कोंडीत शाळेच्या बस, रुग्णवाहिका, चाकरमानी यांचे दररोज हाल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

याच समस्येवरून कल्याण ग्रामीणचे माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच परिस्थिती सुधारली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

राजू पाटील यांची काय आहे पोस्ट

कल्याण-तळोजा मेट्रो ना येथील नागरिकांच्या फायद्यासाठी आहे ना या परिसरातील विद्यार्थ्यांच्या! ही मेट्रॅा फक्त आणि फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठी व याप्रकल्पातून मिळणाऱ्या टक्केवारी साठी येथे आणली आहे. एकीकडे कल्याण-शीळ रस्त्याच्या तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन झाले नाही, दुसरीकडे ठेकेदारांना द्यायला पैसे नाहीत म्हणून पलावा पुल रखडला आहे.

तरीही या प्रकल्पाचेही पुर्ण भूसंपादन झाले नसताना लोकसभेच्या तोंडावर लोकांना खोटा विकास दाखविण्यासाठी काम सुरू करण्यात आले. या ‘बिल्डरांच्या मेट्रॅासाठी’ विद्यार्थी, पेशंट, नोकरदार वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना वेठीस नेण्याचे काम सुरू आहे. आज या कामांमुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमूळे काही शांळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या याचे कोणालाच सोयरसुतक नाही?

आमचे पालकमंत्री तर फक्त बालकाच्या कार्यक्रमाला सायरन वाजवत येतात, इतर वेळी त्यांनाही काही पडली नाही….खरंतर या अनागोंदीला त्यांचाच इतक्या वर्षातला विकासाच्या नावाने चाललेला हा गोंधळ कारणीभूत आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com