

Changes in traffic on Kalyan Shilphata Road
ESakal
डोंबिवली : रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिल्ली ते जेएनपीटी या डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पातील सीटीपी ११ या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या मार्गावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाची उंची कमी असल्याने डीएफसीसी च्या डबल कंटेनर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. यामुळे हा जुना उड्डाणपूल तोडून नव्याने त्याची बांधणी करण्यात येणार आहे. या कामासाठी 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.