
Dombivali News: कल्याणमधील किल्ले दुर्गाडीच्या न्यायालयीन निकालानंतर श्री मलंगगड मुक्तीचा नारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंतीनिमित्त रविवारी (ता. १५) मोठ्या संख्येने कार्यकर्ते मलंगगडावर गेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारीमध्ये मलंगगडाला मुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते.
राज्यात महायुतीचे सरकार येताच किल्ले दुर्गाडीचा निकाल लागला आहे. यानंतर आता मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंतीनिमित्त भाजपच्या आमदार सुलभा गायकवाड या गडावरील उत्सवात सहभागी झाल्या. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘आई भवानी शक्ती दे, श्री मलंगगडाला मुक्ती दे’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे ‘दुर्गाडी’नंतर श्री मलंगगडचा निकालदेखील लवकर लागावा, यासाठी कार्यकर्त्यांनी ‘मलंगमुक्ती’चा नारा दिला.