Kalyan Crime : कल्याणमध्ये तृतीयपंथी चोरांची टोळी सक्रिय; 15 तोळ्याचे दोन सोन्याचे गंठण नेले चोरून

गणेशोत्सव निमित्ताने नागरिकांच्या घरात नाचगाणी करत तृतीयपंथीयांनी केली हातसफाई.
Third Gender Thief
Third Gender Thiefsakal
Updated on

डोंबिवली - कल्याण डोंबिवली परिसरात तृतीयपंथी चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. गणेशोत्सव निमित्त घरात शिरून गणपती समोर नाचगाणी करत ही टोळी हातसफाई देखील करत आहे. त्यानंतर घरमालकाकडून नेक देखील वसूल करत आहेत. कल्याण वाडेघर परिसरात सुरेंद्र पाटील यांच्या घरात अशाच प्रकारे चोरीची घटना घडली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या टोळीने पाटील यांच्या घरातील 15 तोळ्याचे दोन सोन्याचे गंठण चोरून नेले आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com