

kalyan Valdhuni flyover closed for 20 days
ESakal
कल्याण : महानगरपालिकेच्या वतीने उल्हासनगर, कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या सुभाषचंद्र बोस वालधुनी उड्डाणपुलाच्या डांबरीकरण व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, या काळात उड्डाणपुल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. २० डिसेंबर ते १० जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत ही वाहतूक मर्यादा लागू राहील. या कालावधीत पुलावरील जुना डांबर थर काढून नव्या डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. कामाच्या दरम्यान परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कल्याण वाहतूक उपविभागाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.