Kalyan: युक्रेनमधील महिलेशी अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची आत्महत्या; आरोपी पतीला अटक

युक्रेनमधील महिलेशी अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची आत्महत्या; आरोपी पतीला अटक
kolsevadi police station kalyan
kolsevadi police station kalyan Esakal

कल्याण : एका शिपिंग कंपनीत डेस्क मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय पतीचे युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबतच्या अवैध संबंधांना विरोध केला होता. मात्र विरोध करूनही पती गुपचूप पत्नीला न सांगता युक्रेनला गेल्याचे कळल्यानंतर २५ वर्षीय पत्नीने आत्महत्या केली होती.

kolsevadi police station kalyan
Kalyan Dombivali Pollution:मुंबई ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीची हवा सुद्धा झाली दूषित!

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच युक्रेनमधून परतलेल्या आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. नितीश नायर असे अटक आरोपी पतीचे नाव असून तो कल्याण (पूर्व) येथील काटेमानिवली परिसरात राहणारा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे वडील यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले कि, आरोपी नितीशवर माझ्या मुलीचे प्रेम होते. त्यामुळे दोघांचा प्रेमविवाह २०२० मध्ये झाला होता. दोन वर्ष सुखाने संसार सुरू असतानाच, सप्टेंबर महिन्यात मृत पत्नीला माहिती मिळाली होती.

kolsevadi police station kalyan
Kalyan: दुर्गाडी किल्ल्याची जागा खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा होता घाट मात्र...

आपला पती नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. शिवाय तिच्या पतीचे त्या महिलेसोबतचे काही फोटोही मोबिलमध्ये दिसल्याने संशय अधिकच बळावला होता. त्यातच कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, मृत महिलेच्या पतीच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर तिने तिच्या नात्याला विरोध केला होता आणि भविष्यात युक्रेनला न जाण्याचा इशारा पतीला दिला होता.

मात्र ८ नोव्हेंबरला नितीशने आपल्या पत्नीला सांगितले की तो काही कामासाठी बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे. पण त्याऐवजी तो युक्रेनला गेला आणि तिथून त्याने पत्नी मेसेज केला की, मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नाही तसेच तू मला विसरून जा, दुसरा मार्ग निवडावा. असा मॅसेज आरोपी पतीने पत्नीला पाठवला यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती, त्यानंतर तिला खूप मानसिक आघात झाला आणि १० नोव्हेंबर रोजी दिवाळी सणानिमित्त तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

kolsevadi police station kalyan
Kalyan Lok Sabha : श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात नव्या युवराजाची एंट्री, भाजपच्या खेळीने समीकरणे बदलणार ?

या प्रकरणाचा तपास करणार्‍या कोळसेवाडी पोलिसांनी आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या काही मित्रांना मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांना तपासात समोर आहे. शिवाय मृत पत्नीने तिच्या आईला पतीकडून होणाऱ्या आघाताची माहिती दिली होती. तसेच जीवन संपवल्यानंतर, गुरुवारी तिचा पती नितीश मायदेशी परतला आणि परत आल्याची माहिती मिळताच त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. दुसरीकडे आरोपी पती नितीशला अटक केल्यानंतर मृत पत्नीच्या कुटुंबीय त्यांच्या मुलीचा जीव घेतल्याबद्दल त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

kolsevadi police station kalyan
Kalyan Crime News : टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर अत्याचार; घटनेमुळे परिसरात खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com