Kalyan Dombivali Pollution:मुंबई ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीची हवा सुद्धा झाली दूषित!

kdmc
kdmc pollutuion

Kalyan Dombivali Pollution: कल्याण-डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता खालावली असून एक्यूआय इंडेक्सने (हवेची गुणवत्ता) २०० ची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे दमा किंवा श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे अतिशय दाटीवाटीची लोकवस्तीची शहरे आहेत. याठिकाणी लोकांप्रमाणेच वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. त्यातच पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्यापही पूर्णपणे भरण्यात आलेले नसल्याने धुळीचा त्रास अद्यापही कायमच आहे. एकीकडे धुळीचा त्रास, तर दुसरीकडे वाहनांचा धूर याचा परिणाम थेट हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. यात कल्याणमध्ये २०२ तर डोंबिवली परिसरात एक्यूआयची पातळी २५० वर पोहोचली आहे.

अशी मोजली जाते पातळी

हवेच्या गुणवत्तेची पातळी ही हवेतील धूलिकण आणि इतर घातक घटकांचे प्रमाण किती आहे, त्यावरून ठरवली जाते. यासाठी पार्टिक्युलेट मॅटर हे प्रमाण असते. यात पीए १० (पार्टिक्युलेट मॅटर) आणि पीएम २.५ हे दोन घटक असतात. यात पीएम १० म्हणजे १० मायक्रोमीटरपेक्षा सूक्ष्म कण आणि पीएम २.५ म्हणजे अडीच मायक्रो मीटरपेक्षा छोटे असे अतिसूक्ष्म कण याचा समावेश असतो.

kdmc
Mahrashtra Political Crisis: सत्तासंघर्षाचा उद्या फैसला; झिरवाळ म्हणतात, सरकार स्थिर व्हायला पाहिजे!

वायू प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, दम्याचे त्रास अशा आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यासाठी मास्क वापरणे हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी मास्कमुळे काही प्रमाणात हे धूलिकण आपल्या शरीरात जाण्यास मज्जाव होतो. रस्त्यांवरील धूळ आणि गाड्यांचे प्रदूषण हे दोन्ही घटक तातडीने नियंत्रित करणे आवश्यक बनले आहे.

- डॉ. गुरुदत्त भट, बालरोग तज्ज्ञ

kdmc
Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला सुरुवात; 34 याचिकांचं सहा गटांमध्ये वर्गीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com