
Kamothe navi Mumbai : कामोठे येथून अपहरण करून अहमदनगरमधील नेवासा येथे नेलेल्या सातवर्षीय मुलाचा कामोठे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत शोध घेतल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर अपहृत मुलाला त्याच्या वडिलांनीच नेवासा येथे नेल्याचे उघड झाले.
या मुलाचे आई-वडील हे चार-पाच वर्षांपासून वेगवेगळे राहत आहेत. मुलगा आईकडे असून तो भंगार गोळा करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वडिलांनी त्याला सोबत नेल्याचे निष्पन्न झाले आहे.