esakal | देशातील ६८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचे केंद्राचे नियोजन- रावसाहेब दानवे
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Raosaheb Danve

देशातील ६८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचे केंद्राचे नियोजन- रावसाहेब दानवे

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : रेल्वे स्थानकातील (Railway station) गर्दीच्या प्रवासातून (Commuters Crowd) सुटका होण्यासाठी 'डेक' आणि पुलांची उभारणी केली जाणार आहे. सीएसएमटी (CSMT), दादर (Dadar) रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास (station development) करताना 'डेक' आणि पूल उभारणीवर भर दिली जाईल. डेकवरून स्थानकात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार केल्याने गर्दी विभाजित होईल. त्यामुळे मुंबईत 'गर्दीमुक्त रेल्वे स्थानक' (Crowd less station) ही संकल्पना साकारणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली. मंगळवारी (ता.7) रोजी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांचा पाहणी (railway inspection) दौरा केला. तर, सीएसएमटी ते दादर दरम्यान द्वितीय श्रेणीतील डब्यांतून लोकल प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. मुंबई सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याणसह देशातील 68 रेल्वे स्थानकांचा पीपीपी मॉडेलवर विकास करण्याचे केंद्राचे नियोजन आहे.असंही ते म्हणाले.

हेही वाचा: चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सीएसएमटी ते ठाणे नियोजित लोकल प्रवास होता. मात्र, अधिक वेळ गेल्याने सीएसएमटी ते दादर प्रवास केला. यावेळी प्रवाशांशी संवाद केला. यासह लोकलने महिला राज असलेल्या माटुंगा रेल्वे स्थानकावर जाऊन भेट दिली. माटुंगा रेल्वे स्थानकाच्या स्थानक प्रबंधक मीना संटी आणि इतर महिला स्टाफशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांची आणि त्यांनी त्या आव्हानांवर धैर्याने आणि दृढनिश्चयाने कशी मात केली याची माहिती घेतली.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर हे महत्त्वाचे स्थानक आहे. स्थानकाच्या दोन्ही दिशेकडील प्रवेशद्वारावर सकाळ-सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. या गर्दीवर आळा घालण्यासाठी स्थानकातील प्रवेशद्वारासह प्रवेशद्वारालगतच्या परिसराचादेखील योग्य वापर करण्यात येणार आहे. यानुसार रेल्वे स्थानकांवर 'डेक' उभारण्यात येणार असून स्थानकांतील सध्याच्या प्रवेशद्वाराची जोडणी पुलाच्या माध्यमाने करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर स्थानकात येण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (आयआरएसडीसी) पुनर्विकासाचे हे काम हाती घेतले असून याबाबतची सविस्तर माहिती दानवे यांना देण्यात आली आहे. 

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून रेल्वेमध्ये सुधारणा सुरु आहेत. मुंबई सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याणसह देशातील 68 रेल्वे स्थानकांचा पीपीपी मॉडेलवर विकास करण्याचे केंद्राचे नियोजन आहे. मुंबईकरांची लाईफलाईन मुंबई लोकलवर केंद्राने विशेष लक्ष वेढले आहे. वाहनतळाच्या धर्तीवर मुंबईतील रेल्वे स्थानके उभारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच लोकलमधील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी ठोस पाऊल उचलणार असल्याचे मंत्री दानवे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त सुविधा मुंबईकरांना कशा उपलब्ध होतील, याचा प्राधान्याने विचार करणार येईल. रेल्वे मार्फत सुमारे 50 हजार कोंटीचा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: रेल्वे प्रवास करणे हा मूलभूत अधिकार पण परिस्थितीनुसार निर्बंध लागू शकतात- हायकोर्ट

सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी रेल्वे राज्यमंत्र्यांनी फलाट क्रमांक 18 येथील स्टेशन पुनर्विकास साइटलाही भेट दिली. सीएसएमटीच्या दक्षिणेकडील बाजूला बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मात्र, उत्तरेकडे कमी मार्ग आहेत. त्यामुळे मस्जिद दिशेकडे 'डेक' उभारण्यात येणार आहे. हा डेक क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेला जोडला जाणार आहे.

विद्यार्थ्यांचा लोकल प्रवास

केंद्र सरकारची काहीही अडचण नाही. राज्य सरकारने आम्हाला विनंती करावी, राज्य सरकारने म्हटले, विद्यार्थ्यांना द्या तर आम्ही ती देखील देऊ, असे दानवे म्हणाले. सीएसएमटीच्या पुनर्विकासाबाबत एमएमआरडीए, बीपीटी, राज्य सरकार अशा सर्व संस्थांशी बोलून दीड महिन्याच्या काळात सर्व समस्या सोडवण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. डिमेलो रोड इथे हार्बर मार्गिका नेण्यात येणार आहे. तिथेच मेट्रो 11 ची लाईन येईल. तसेच पूर्व द्रुतगती मार्गाला एमएमआरडीए पुढे आणणार आहे. हे सर्व त्या एकाच ठिकाणी होईल. त्यामुळे यांचा एकत्रित विकास होईल. इथे मल्टी मॉडेल हब तयार होणार आहे. त्यामुळे या डिमेलो रोड वर यु टर्न बनविण्यात येणार आहे. यासाठी बीपीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाची जमीन लागणार आहे. दादरच्या पुनर्विकासाचे नियोजन आयआरएसडीसीने बनविले आहे. हे नियोजन पूर्ण झाल्यावर प्लॅन पूर्ण होतील तेव्हा ते राज्य सरकारकडे पाठविले जाणार आहे, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले.

loading image
go to top