मुंबईने मला खूप काही दिलं, आता न्यायही हवाय; कंगना रानौत राज्यपालांच्या भेटीला

तुषार सोनवणे
Sunday, 13 September 2020

गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रानौतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रानौतने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. जवळपास 45 मिनिटे राज्यपाल आणि कंगना .यांच्यात चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत कंगनाने राज्यपालांशी चर्चा केली आहे. यावेळी तीची बहीण रंगोलीही तिच्यासोबत उपस्थित होती.

शिवसेना भवनासमोर भाजपची जोरदार निदर्शने; शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप

राज्यपालांशी झालेल्या चर्चेदरम्यान, कंगनाने आपल्या कार्यालयावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले.मला न्याय मिळायला हवा. मी राजकारणी नाही, मी सामान्य व्यक्ती आहे. राज्यपालांनी माझं म्हणणं मुलीप्रमाणे ऐकून घेतलं. मुंबईने आतापर्यंत मला खूप काही दिलं आहे. आता न्यायही द्यावा, असंही तीने य़ावेळी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या कोरोना मृत्यूदराबाबत दिलासादायक अपडेट; परंतु राज्यातील परिस्थिती चिंताजनकच

कंगनाच्या कार्यालयाचवर झालेल्या कारवाईप्रकरणी राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी त्यासंबधीचा राज्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्याकडून माहिती घेतली होती. कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईप्रकरणी राज्य  सरकारची भूमिका काय याबाबत त्यांनी विचारणा केली होती.दरम्यान उच्च न्यायालयाने, कंगनाच्या कार्यालयाची स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश कंगना आणि बीएमसीला दिले आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut on maharashtra governor bhagat singh koshyari meet