esakal | कंगनाच्या अडचणीत वाढ, वांद्रे पोलिसांकडून अभिनेत्रीला तिसऱ्यांदा समन्स
sakal

बोलून बातमी शोधा

कंगनाच्या अडचणीत वाढ, वांद्रे पोलिसांकडून अभिनेत्रीला तिसऱ्यांदा समन्स

कंगनाला तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेत. कंगना आणि रंगोली यांच्यावर वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. 

कंगनाच्या अडचणीत वाढ, वांद्रे पोलिसांकडून अभिनेत्रीला तिसऱ्यांदा समन्स

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतवर विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाच्या  गुन्ह्याप्रकरणी गेल्या महिन्यातच समन्स पाठवण्यात आलेत. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, कंगनाला तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेत. कंगना आणि रंगोली यांच्यावर वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. 

वांद्रे पोलिस ठाण्यात कंगना रनौत आणि तिची बहिण रांगोळी यांना या महिन्यात  23 आणि 24 रोजी हजर होण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे.

वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कंगना करत असल्याचे याचिकेत म्हटले होते. कास्टींग डायरेक्टर मुनावर अली उर्फ साहिल सय्यद यांनी ही याचिका दाखल केली होती. समाजमाध्यमांत तसेच टीव्हीवर सगळीकडे बॉलिवूडच्या विरोधात बोलत आहे. ती सतत बॉलिवूड विरोधात माहिती पसरवली जात आहे. कंगनाविरोधात विरोधात दोघांनी वांद्रे न्यायालयात याचिका दाखल केली होती.

गोस्वामींच्या अटकेवर संतापली होती कंगना

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली होती. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर कंगना हिनं शिवसेनेवर निशाणा साधला होता. कंगनानं पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला. यात ठाकरे सरकारवर निशाणा साधत आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता.

अधिक वाचा-  रुग्णालये, कोविड केअर केंद्रातील रुग्णसंख्येत घट; 66 टक्के बेड्स रिक्त

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगनानं म्हटलं की,  तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. त्यांना त्रास दिलात,  तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात? सोनिया सेना किती आवाज बंद करणार आहे?मात्र हा आवाज वाढत जाणार आहे.

पुढे कंगनानं व्हिडिओमध्ये म्हटलं की,  ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी, अधिकारांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत असे अनेक लोकांचे बळी गेले. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील.

Kangana Ranavat troubles escalate actress summoned third time by Bandra police