esakal | रुग्णालये, कोविड केअर केंद्रातील रुग्णसंख्येत घट; 66 टक्के बेड्स रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालये, कोविड केअर केंद्रातील रुग्णसंख्येत घट; 66 टक्के बेड्स रिक्त

मुंबईतील रुग्णालये आणि कोविड केअर केंद्रातील 66 टक्के बेड्स रिक्त आहेत. फक्त 34 टक्के खाटा सध्याच्या परिस्थितीत भरलेल्या आहेत. शिवाय, सक्रिय रुग्णांची संख्या ही घटली असून रुग्णालयात इतर रुग्णांची गर्दी वाढत आहे. 

रुग्णालये, कोविड केअर केंद्रातील रुग्णसंख्येत घट; 66 टक्के बेड्स रिक्त

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील रुग्णालये आणि कोविड केअर केंद्रातील 66 टक्के बेड्स रिक्त आहेत. फक्त 34 टक्के खाटा सध्याच्या परिस्थितीत भरलेल्या आहेत. शिवाय, सक्रिय रुग्णांची संख्या ही घटली असून रुग्णालयात इतर रुग्णांची गर्दी वाढत आहे. 

कोरोना संक्रमित रूग्णांच्या उपचारासाठी डेडिकेटेड कोविड-19 हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड -19 आरोग्य केंद्र आणि कोविड -19 केअर सेंटर, टाइप -2 (सीसीसी -2 ) यासह मुंबईत एकूण 17, 707 बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. रविवारी यातील किमान 64.90 टक्के बेड रिक्त होते. त्याचप्रमाणे एकूण 2003 आयसीयू बेड्स पैकी 40 टक्के म्हणजेच 804 बेड्स सध्या रिक्त आहेत. मुंबईत 8 हजार 689 ऑक्सिजन बेड आहेत. यापैकी 68.90 टक्के आणि 1,183 व्हेंटिलेटर बेडपैकी 31.53 टक्के म्हणजेच 373 बेड रिक्त आहेत.

सध्या मुंबईत कोरोनाग्रस्त लोकांची संख्या 1000 वर गेली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्याही 10 हजारांवर पोहोचली आहे. पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील जवळपास 66 टक्के बेड रिक्त आहेत.

अधिक वाचा-  मुंबईत दिवाळीमध्ये फटाके फोडले, नियमभंगाच्या 40 प्रकरणांची नोंद

गोरेगाव नेस्कोच्या जंम्बो कोविड केंद्रातील 1940 बेडपैकी 220 आयसीयू आणि केवळ 259 बेड्स भरलेले आहेत. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून रुग्णांमध्ये घट झाली असून दररोज फक्त 20 ते 25 नवीन प्रवेश येत असल्याचे गोरेगाव नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अन्द्राडे यांनी सांगितले.

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या अखेरीस नवीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. यासह रुग्णालयात सक्रिय रूग्णांची संख्याही 10000 च्या जवळपास आली आहे. या क्षणी बरेचसे बेड्स रिक्त आहेत. मात्र आम्ही कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणार नाही. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डिसेंबरपर्यंत आम्ही बेडची संख्या कमी करणार नाही. दुर्देवाने, दुसरी लाट आली तर, आम्ही जवळपास 1500 रूग्ण भरती करण्यास तयार आहोत.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Hospitals Covid Care Centers only 34 percent patients filled other patients

loading image