कन्हैया कुमारने घेतली राज्यातील कॅबिनेट मंत्र्याची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तुषार सोनवणे
Friday, 16 October 2020

बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बड्या नेत्याने जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई  -  बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बड्या नेत्याने जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. कन्हैया कुमारने महाराष्ट्रात येऊन. बिहार निवडणूकांच्या अनुषंगाने या नेत्याशी खलबत केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महामारीतही राज्याचा आरोग्य विभाग सलाईनवर, भरती प्रक्रियेचे लाखो अर्ज पडून

कन्हैया कुमारने राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात भेट घेतली. दोघांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. बिहार निवडणूकांनी चांगलाच जोर धरला आहे. त्यापार्श्वभूमीवर दोघांमधील भेटीमुळे राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.समाजमाध्यमांवर आपल्या खास शैलीत नेहमीच राजकिय भाष्य़ करणारे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याभेटीहबाबत गुप्तता ठेवली होती. 

'मुलूंड' ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट, सात दिवसात एक हजार नव्या रुग्णांची भर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांच्यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या प्रचाराल कन्हैया कुमार आले होते. आता जितेंद्र आव्हाडही बिहार येथे प्रचारला जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बिहारच्या नेत्यांकडून आणि पोलिसांकडून महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. शिवसेना देखील या निवडणूकांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. बिहारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोबत निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanhaiya Kumar met Jitendra Awhad on the backdrop of Bihar elections