'ती' पक्षाची भुमिका नाही, वांद्रे येथील कराची बेकरी वादावर शिवसेनेचा पडदा

समीर सुर्वे
Thursday, 19 November 2020

वांद्रे येथील कराची बेकरी आणि कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांच्यासह मनसेनेही केली होती.

मुंबई, ता. 19: वांद्रे येथील कराची बेकरी आणि कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांच्यासह मनसेनेही केली होती. मात्र, शिवसेनेने आता या वादावर पडदा टाकला असून ही पक्षाची भुमिका नसल्याचे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

महत्त्वाची बातमी : विज बिल माफी : विरोधकांची दखल न घेण्याचे सरकारचे धोरण

नितीन नांदगावकर यांनी कराची बेकरीचे नाव बदलण्याचा इशारा संबंधीत दुकानाच्या मालकाला दिला होता. मनसेनेही हीच भुमिका घेतली आहे. मात्र, संजय राऊत यांनी नांदगावकर यांच्या भुमिकेला फाटा देत कराची स्वीट्स आणि बेकरी ही दुकाने गेल्या 60 वर्षांपासून आहेत. त्यांचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही. यामुळे दुकानाचे नाव बदलण्याच्या मागणीला कोणताही अर्थ नसून ती पक्षाची अधिकृत भुमिका नसल्याचे ट्वीट राऊत यांनी केले आहे. यामुळे कराची नावावरुन शिवसेनेतील मतभिन्नता स्पष्ट झाली आहे.

महत्त्वाची बातमी : "चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

नांदगावर हे पुर्वी मनसेमध्ये होते. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते नेहमीच प्रकाश झोतात राहातात. मात्र, विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्या कामाची शैली बदलली नाही. शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी मराठी रिक्षा चालकाची रिक्षा फोडल्याचाही मुद्दा गाजला होता. या रिक्षाचे मिटर नियमापेक्षा जास्त वेगाने चालत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

( संपादन - सुमित बागुल )

Karachi bakery and karachi sweets have nothing to do with Pakistan sanjay raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karachi bakery and karachi sweets have nothing to do with Pakistan sanjay raut