esakal | माजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत ईडी कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek-Patil-Arrested

माजी आमदार विवेक पाटील यांना 25 जूनपर्यंत ईडी कोठडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी करण्यात आली अटक

मुंबई: रायगड जिल्ह्यातील कर्नाळा सहकारी बँक (Karnala Bank) गैरव्यवहाराप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील (Vivek Patil) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) मंगळवारी अटक (Arrest) केली होती. त्यांना विशेष न्यायालयापुढे (Special Court) हजर केले असता न्यायालयाने त्यांना 25 जूनपर्यंत ईडीची कोठडी (ED Custody) सुनावली. कर्नाळा बँकेत कोट्यावधींचा गैरव्यवहार (Money Laundering) उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे ठेवीदारांनी आंदोनही केले हो आंदोलनही केले होते. या बँकेत 50 हजार 689 ठेवीदार आहेत. (Karnala Bank Fraud Ex MLA Vivek Patil sent to ED Custody till 25 June)

हेही वाचा: भाजप-शिवसेनेमध्ये तुफान राडा; शिवसेना भवनासमोर घडला प्रकार

कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पनवेलमधील स्थानिक आमदाराने याप्रकरणात ईडीला पुरावे सादर केले होते. कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे या आधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: Share Market: निर्देशांक घसरले; अदानीमध्ये आजही जोरदार विक्री

कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. या गुन्ह्याला आधार बनवून ईडीने याप्रकरणी झालेल्या संशयीत मनी लाँडरींगचा तपास सुरू केला होता. त्या अंतर्गत संशयीत आरोपींनी 512 कोटी 54 लाख रुपये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज घेऊन व्यवहारात आणले, असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी मंगळवारी पाटील यांना पनवेलमधून अटक करण्यात आली. त्यानंतर विवेक पाटील यांना पनवेलमधून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना विशेष ईडी न्यायालयात आणण्यात आले. आज त्यांना 25 तारखेपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली

loading image