Raju Patil: रस्त्यावरील खड्डे बुजवून आमदार पाटील यांना शुभेच्छा!

Raju Patil: कल्याण ग्रामीण भागात आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद
Raju Patil
Raju Patilsakal

Raju Patil : कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्याची खड्डयांनी दुरावस्था झाली आहे. त्यातच सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी, कमानी लावण्यात आल्या आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून मनसे आमदार राजू पाटील यांनी वाढदिवसाला बॅनर न लावता त्याऐवजी खड्डे बुजवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून कल्याण ग्रामीण भाग, 14 गाव परिसर, दिवा या भागातील कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध करत रस्त्यांवरील खड्डे बुजवित आमदार पाटील यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात कुठेही बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करू नका. त्या बदल्यात रस्त्यावरील एक खड्डा बुजवा असे आवाहन कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडून करण्यात आले होते. शहरातील रस्त्यांची खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सव पूर्वी खड्डे बुजवून रस्ते स्थिती सुधारली जाईल असे आश्वासन पालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले होते. गणेशोत्सव सुरू झाला तरी रस्त्यांची स्थिती काही सुधारली नाही. नागरिकांना गणेशाचे आगमन खड्ड्यांतून करावे लागले. त्यातच सण उत्सवांच्या निमित्ताने शहरभर बॅनर आणि कमानी लावण्यात आल्या आहेत. यामुळे शहराचा चेहराच बदलला आहे. खड्ड्यांकडे लक्ष देण्यास राजकीय पदाधिकाऱ्यांना वेळ नसून कमानी, बॅनरची मात्र स्पर्धा लागली असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Raju Patil
MLA Raju Patil : निवडणूका आल्याने यांचे फार्स झाले चालू; इंडिया आघाडी व महायुतीवर मनसेचा टोला

आमदार राजू पाटील यांचा 26 सप्टेंबर ला वाढदिवस असल्याने त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावून शहर विद्रुपीकरणात भर घालू नका. त्यापेक्षा रस्त्यावरील एक खड्डा बुजवा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले होते.

कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे पदाधिकारी योगेश पाटील, दिवा येथे तुषार पाटील, शरद पाटील, विजय पाटील, संजय पाटील, रोहित भोईर, प्रभाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी विविध भागांतील खड्डे बुजविले. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडावर केडीएमसी आयुक्त यांचे नाव लिहून खड्ड्यांत हे दगड भरण्यात आले. आताचे आंदोलन हे शांततेने करण्यात आले असून यापुढे मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा यावेळी मनसे पदाधिकारी योगेश पाटील यांच्याकडून देण्यात आला.

Raju Patil
MLA Raju Patil : निवडणूका आल्याने यांचे फार्स झाले चालू; इंडिया आघाडी व महायुतीवर मनसेचा टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com