

Central Railway Megablock
ESakal
मुंबई : आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकच्या कामासाठी मध्य रेल्वेने ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवस विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे पहिल्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आसनगाव-कसारा लोकल सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. चार लोकल रद्द करण्यात आल्या असून, काही लोकल आसनगाव येथेच थांबविण्यात येणार आहेत. तसेच काही फेऱ्या आसनगावहून सुरू केल्या जाणार आहेत.