Kashedi Ghat Landslide : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

Raigad landslide news : कशेडी घाटातील दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आयएमडीने येलो अलर्ट दिला असून पावसाचा इशारा कायम आहे.
Kashedi Ghat Landslide raigad

Kashedi Ghat Landslide raigad

esakal

Updated on

Mumbai Goa Highway travel advisory : रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ धामणदिवी गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी (ता. १५) सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com