
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. डॉ. देवेंद्र पुजारी व डॉ. श्रीकृष्ण कुमावत अशी दोघांची नावे आहेत. यातील कुमावत यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय व्यवसाय करण्याची पात्रता नाही, तर पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपॅथी ही शैक्षणिक अहर्ता आहे.