

Dombivli-Thane Bus
ESakal
डोंबिवली : डोंबिवली ते ठाणे यादरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडीएमसी आणि ठाणे महापालिकेच्या टीएमसीने संयुक्तपणे नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मार्चपासून ही सेवा प्रवाशांच्या भेटीला येणार असली, तरी बस थांब्याच्या अंतरावरून प्रवाशांमध्ये चर्चा सुरू आहे.