

KDMC Election
ESakal
डोंबिवली : महापालिका निवडणुकांत वॉर्डनिहाय प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक उमेदवार विकासाची स्वप्ने दाखवत असून, रस्ते, पाणी, कचरा, आरोग्य, शिक्षण अशा प्रश्नांवर आश्वासनांची रेलचेल सुरू आहे. मात्र पाच वर्षांनंतर हीच आश्वासने हवेत विरून जातात, असा मतदारांचा अनुभव आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांकडून एक थेट आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे. “निवडणूक लढवणारे उमेदवार हे सर्व जाहीरपणे लिहून देतील का?”