

KDMC Clashes over rehabilitation
ESakal
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर सोमवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, या चर्चेत भाजप नगरसेवक मंदार हळबे आणि शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांनी पालिका कामाजात आमदारांचा होणारा हस्तक्षेप यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.