
डोंबिवली : आर्थिक क्षेत्रासह देशात सुरू असणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये चार्टड अकाउंटंट (सीए) आज कार्यरत असून देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य त्यांच्या हातात असल्याची प्रशंसा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केली.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटसच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे आयोजित डायरेक्ट टॅक्स विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी देशातील सीएंबाबत हे गौरवोद्गार काढले.