esakal | 'पाप केले की कोरोना होतो'; संजय राऊतांच्या विधानाचा भाजपकडून समाचार
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

'पाप केले की कोरोना होतो'; संजय राऊतांच्या विधानाचा भाजपकडून समाचार

sakal_logo
By
- कृष्ण जोशी

मुंबई : पाप केले की कोरोना (corona) होतो, अशा आशयाचे विधान करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर भाजपचे (BJP leaders) नेते तुटून पडले असून, या विधानांबद्दल (corona statement) संजय राऊत यांनी जनतेची माफी (people apology) मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: माथेरानची निसर्गसंपदा बहरली

तर अशी विधाने करताना, युवराजांनाही (पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे) कोरोना झाला होता, हे कार्यकारी (संपादक, सामना) विसरले का, असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना लगावला आहे. भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली, पाप केलं की कोरोना होतो, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे.

भारतीय जनता पक्षावर टीका करताना राऊत यांनी वरील आशयाची विधाने केली होती. त्यासंदर्भातील व्हिडियो काही वाहिन्यांवर प्रसारित झाल्यावर ते समाजमाध्यमांवरही फिरू लागले. भाजप वर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आपण अपमान करतो आहोत, हे देखील त्यांच्या ध्यानात आले नाही. स्वतःला सर्वज्ञ समजून सर्व विषयांवर आपले ज्ञानामृत सर्वांना पाजणारे संजय राऊत प्रत्यक्षात नेहमीच अशाच प्रकारे कसलीही माहिती न घेता विधाने करतात, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे.

हेही वाचा: हुश्श, झाला एकदाचा 'एमपीएससी' चा पेपर!

पाप करणाऱ्यांना कोरोना होतो, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लाखो निष्पाप जीवांचा अपमान केला आहे. या साथीत ज्यांनी आपले आप्त गमावले त्यांच्या भावनांची राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. त्याबद्दल या दिवंगतांची राऊत यांनी माफी मागितली पाहिजे, असे ट्वीट भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.

राऊत यांच्या विधानांवरून नेटकऱ्यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. या महाशयांनी विश्वप्रवक्ते आणि कार्यकारी संपादक या पदांवरून लगेच दूर होणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची सेवा करताना काही डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली व त्यात त्यांचा मृत्यु झाला, त्यांनी काय पाप केले होते, रुग्णांचे सेवा करणे हे पाप आहे का. ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार सोडले त्यांना पाप-पुण्याचा लेखाजोखा ठेऊ नये, असे टोमणे नेटकऱ्यांनी समाजमाध्यमांवर लगावले आहेत.

कोरोना हा काही रोग नाहिये, जे कोरोनामुळे मृत्युमुखी पडले ते जगण्यास लायक नव्हते, अशा आशयाचे विधान शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. जगण्यास लायक नव्हते म्हणजे मरण पावलेले रुग्ण हे शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त नव्हते, अशा अर्थाने भिडे गुरुजींना म्हणायचे होते, अशीही सारवासारव भिडे यांच्या समर्थकांनी नंतर केली होती. त्यानंतर आता राऊत यांनीही कोरोनाशी संबंधित वादग्रस्त विधान केल्याने त्यांनाही टिकेचे धनी व्हावे लागते आहे.

loading image
go to top