

KDMC
Esakal
डोंबिवली : 'पोत्याने पैसा ओतून वकील लावले तरी देवाच्या न्यायालयात सुटका नाही. मारहाणीच्या घटनेनंतर मुलगा गंभीर मानसिक धक्क्यात असून, झोपेतही दचकतो. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर कारवाई करावी,' अशी मागणी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण झालेल्या डॉ. वैभव साळुंके यांच्या आईने सोशल मीडियावर केली आहे. तसेच स्वतःला आणि मुलाला पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे.