
डोंबिवली : मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांवर केडीएमसीने कारवाई करत मालमत्ता सील करण्यास सुरुवात केली आहे. यातून पालिकेचे कल्याण पश्चिमेतील वाहनतळ देखील सुटलेले नाही. रेल्वे स्थानकाजवळील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळाच्या ठेकेदाराने महापालिकेचे 1 कोटी 88 लाख रूपयांचे भाडे थकविले आहे. नोटीस बजावून देखील ठेकेदार भाडे भरत नसल्याने अखेर गुरुवारी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीप कपोते वाहनतळ ताब्यात घेण्याची कार्यवाही केली.