esakal | 'KDMC'च्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

'KDMC'च्या कनिष्ठ अभियंत्यास लाच घेताना अटक

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून (KDMC) पाण्याची नवीन पाईपलाईन (water new pipeline) मंजूर करून घेणे व त्याची वर्क ऑर्डर (work order) काढण्याच्या कामासाठी महापालिकेच्या प्रभारी कनिष्ठ अभियंत्याने तक्रारदारांकडे 5 हजार रुपयांची लाच (Bribe) मागितली होती. यातील 4 हजाराची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज व प्लंबर रविंद्र डायरे याला मंगळवारी अटक केली.

हेही वाचा: देशातील ६८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचे केंद्राचे नियोजन- रावसाहेब दानवे

डोंबिवलीतील तक्रारदार यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे पिण्याच्या पाण्याची नविन पाईपलाईन मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर करून घेण्यासाठी मागणी केली होती. या कामासाठी डोंबिवली विभागीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागातील प्रभारी कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती 4 हजर रुपये देण्याचे ठरले. याविषयी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वाळंज यांची तक्रार केली होती.

विभागाने सापळा रचून मंगळवारी दुपारी कनिष्ठ अभियंता वाळंज व लायसन्स प्लम्बर रविंद्र डावरे याला 4 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. काही दिवसांपूर्वीच कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांना 1 लाख रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तोच आता पालिका अभियंत्यांला अटक करण्यात आल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेतील भ्रष्ट कारभार समोर येत आहे.

loading image
go to top