KDMC Water Problem: जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा खंडित !

Kalyan Latest Update: विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये सोमवारी रात्री बिघाड झाल्याने मोहिली केंद्रातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. | Water Supply to Kalyan Dombivli Cut Off Due to Technical Glitch in Mohili Water Treatment Plant
KDMC Water Problem: जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा खंडित !
Updated on

Dombivali Latest News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहीली जलशुद्धीकरण आणि उदंचन केंद्राच्या वीज वाहिनीमध्ये सोमवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. परिणामी मंगळवारी सकाळी कल्याण डोंबिवली तसेच ग्रामीण भागातील पाणी पुरवठा खंडित झाला आहे.

महावितरणकडून हा तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. नेतीवली वाहिनीचे बिघाड दुरुस्ती काम पूर्ण झाले असून इतर काम केले जात आहे. काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

KDMC Water Problem: जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा खंडित !
KDMC: डोंबिवली स्कायवॉकवर गर्दुल्ल्यांचा हैदोस, प्रवाशांसमोर लघुशंका, महिलांमध्ये असुरक्षितता

कल्याण डोंबिवलीच्या मोहिली उदंचन आणि मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो. हा विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये सोमवारी रात्री बिघाड झाल्याने मोहिली केंद्रातून होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

महापालिकेच्या मोहिली आणि नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रामधून कल्याण ग्रामिण आणि डोंबिवली पूर्व - पश्चिम तसेच कल्याण पूर्व पश्चिम विभागामधील भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड या भागास पाणी पुरवठा केला जातो.

KDMC Water Problem: जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा खंडित !
KDMC: स्विमिंग पूलमध्ये पोहताना मुलगा जखमी, पालिकेच्या गलथान कारभारला जबाबदार कोण ?

या बिघाडामुळे या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. विद्युत वाहिनीवरील दुरुस्तीचे काम महावितरण कडून हाती घेण्यात आले आहे. काम पूर्ण होईपर्यंत येथील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे

मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान नेतीवलीला

होणाऱ्या विद्युत वाहिनीवरील बिघाड दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे नेतीवली वरील पाणी पुरवठा दुपारी 1 पर्यत सुरू केला जाईल. यामुळे डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला जाईल असे केडीएमसी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

KDMC Water Problem: जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा खंडित !
KDMC: कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद, वाचा काय आहे कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com