
डोंबिवली : रस्त्यांवरील खड्डे, वाहन कोंडी त्यासोबतच सतत कोसळणारा पाऊस यामुळे भक्तांची गणपती विसर्जनासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमसीने खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांची माहिती एका लिंकवर देण्यात आली आहे. त्यावरुन भक्तांना आपल्या घराजवळील विसर्जन स्थळांची माहिती, कोठे वाहन कोंडी आहे याची माहिती देण्यात आली आहे.